पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'धर्म या शब्दाचा पगडा आणि धास्ती सर्वसामान्य माणसाच्या मनावर असतेच. अगदी आजही. मग तो धर्म कोणताही असो. परंपरागत धर्म अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेला असतो. या अपरिवर्तनीय नियमांचा ऐहिक जगण्याच्या संदर्भात सखोल शोध घेऊन, आजवर काही शोधकांनी धाडसाने नव्या दिशा शोधल्या. त्यांना मानणारे, त्या दिशांनी जाणारे अनुसरक मिळाले.
 इ.स. पूर्व सुमारे ६०० ते ५५० वर्षापूर्वी हिंदुधर्मातील चातुर्वर्ण्य आणि धर्मसुत्रे यांनी सर्वसामान्य माणसाचे जगणे कंटकमय केलेले होते. जखडून टाकले होते. धर्माच्या नावाने मुली देवाला अर्पण केल्या जातात, विधवा स्त्रीस जाळले जाते. हिंदू धर्माने तर स्त्री ही सर्वार्थाने दुय्यम, दासीसमान मानली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीत जन्मलेल्या स्त्रियांनाही ज्ञानाचा अधिकार नव्हता. चातुर्वर्ण्याची नियमांनी बांधलेली धर्मव्यवस्था आणि निसर्गाने माणसाला बहाल केलेल्या चार गरजा - आहार, निद्रा, भय, मैथुन! त्यांच्या झटापटीतून जातींची भेंडोळी निर्माण झाली. दलितांप्रमाणे शूद्रत्वाचा शिक्का स्त्रियांच्या कपाळावर मारला. त्यांच्या ताटातही दारिद्रय, शिवाशीव टाकलेलीच होती. स्त्रियांच्या अब्रूला सतत धोका होता. ८००-१००० वर्षांपूर्वी त्यांचा महत्वाचा भाकरीसाठीचा व्यवसाय 'दासी' होणे हाच होता. रूपवती स्त्रिया संगीत, नृत्य, मनोरंजन करणारे संवाद याचे शिक्षण घेऊन वारयोशिता... स्वतःच्या इच्छेनुरूप प्रियकर निवडून त्याच्याकडून धन गोळा करणाऱ्या स्त्रिया... होत. काही नर्तिका, काही

४२ / रुणझुणत्या पाखरा