पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मनोगत

 डिसेंबर २००६ च्या सुरुवातीचे दिवस. दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयातून मुकुंद सांगोराम यांचा दूरध्वनी आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणाऱ्या अंकातील 'संवाद' या सदरात लिहिण्याची अपूर्व संधी दै. लोकसत्ता परिवाराने मला दिली होती. माझ्यातल्या लेखिकेचा हात पुन्हा एकदा 'लिहिता' झाला, दै. लोकसत्ता परिवार, संपादक श्री. कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि लेख मिळाल्याची मी चौकशी करताच 'हं बोला शैला भाबी' अशा मधुर शब्दात संवाद साधणारे श्री. प्रमोद माने, माझे जीवनसाथी डॉ. द्वारकादास लोहिया, डी.टी.पी. करणारे श्री. बिभीषण घाडगे, श्री. अशोक केदार, अंजली इंगळे, धावपळ करणारी अंजू कोदरकर आणि अनेक अनेक...
 ...प्रस्तावना लिहिण्याची विनंती करताच तात्काळ होकार देणारे माझे छोटे स्नेही, प्रा. विश्वास वसेकर त्यांची पत्नी सौ. शैला हे सगळे, ज्यांनी 'संवाद' सुफळ समृद्ध केला त्या सर्वांची मी ऋणी आहे.


-शैला लोहिया

रुणझुणत्या पाखरा/ तीन