पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नृत्य एकमेकांच्या हातात हात घालून गोलाकारात असते. मध्येच गोलांची दिशा बदलते. त्याची लयच अन कोकणी गीत ही त्यांची खासियत. 'गणराया पडतो पाया पडतो पाया धावत येरे मती मला देरे. येऊन सभेच्या ठाया...' हे नृत्य महाराष्ट्र दर्शनमध्ये होते आणि शेवटी गणेशोत्सव आणि लेझिम. मराठी संस्कृतीचा गाभा.
 महाराष्ट्र दर्शनची सुरवात कवी वसंत बापटांच्या गर्जा जयजयकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार' या गीताने होई.

जय वऱ्हाडचे आजोळ, जय अजंठानि वेरूळ
जय बारा मावळ बाई जावळ खानदेश सातार...

 संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक आलेख संयत शब्दांतून त्यात रेखाटला होता. तर शेवटी त्यांचेच गीत.
जय हिंद हिंद, आनंदभुवन, जय भारतवर्ष महान ॥धृ॥
हा रजत शिखरधर गिरिवर सुंदर उत्तरेस हिमवान
हे नील गगन गत चक्र सुदर्शन तळपत वरि भास्वान्
हे चन्द्रचलित जल उर्मिल सागर मंद्रगाती मधुगान...

 हे गीत होई व २ तास ५० मिनिटांची सांस्कृतिक झलक संपे...
 गेली अनेकवर्षे प्रत्येक महाराष्ट्र दिनी अनेक सेवादल सैनिकांच्या कलाकार... गायक... तंत्रज्ञ... यांच्या मनात महाराष्ट्र दर्शन' जागे होते. साठी ओलांडली तरी जुन्या आठवणींनी मन शहारून जाते आणि बहारून जाते.

रुणझुणत्या पाखरा / २५