पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फुगड्यांचे प्रकार... पिंगा... खुर्ची का मिरची हा नववधूला फेरात अडकवून, तिला बाहेर न जाऊ देण्याची कसरत, सासुरवाशिणी, लेकी, वयस्क सासवा... काक्या, माम्या अशा समस्त महिलांना अंतर्बाह्य मोकळे करणाऱ्या खेळांचा समावेश असे. नाव घेण्याचा (अर्थात पतीचे) कार्यक्रम असेच. आज ते खेळ उखाणे पार अंधारात पुरले गेले आहेत.
 मग एकनाथांचे भारूड, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, नामदेवांच्या अभंगाची, स्वामी समर्थांच्या दासबोध यांची चित्रमय, संवादमय दखल. पंतांच्या कवितेतील हंसांच्या क्रिडेचे नृत्यमय दर्शन. सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे... हे नृत्य सुधाताईची चिंटुकली झेलम नि आवाबेनची माणिक करत असत. आज झेलम ओडिसी नृत्याची प्रख्यात जाणकार, अदाकार आहे. रामजोशीच्या वेशातले उमदे बापटकाका. 'सांग सखे सुंदरी कुण्या ग सुभगाची मदन-मंजिरी' या लावणीच्या ठेक्यावर नाचणारी आमची सुधाताई (वर्दे) ती नाचू लागली की लय अक्षरश: तिच्या नृत्याविष्कारातून लवलवू लागे. शाहीर लिलाधर हेगडे पठे बापुरावांचा पोवाडा सादर करीत. बैठकीची लावणी ही महाराष्ट्राची खासियत.

पाऊस वर पडतो, सख्या रे रात्र अशी अंधारी
भिजत मजसाठी तू उभा केव्हाचा दारी...

 अत्यन्त करूणार्त स्वरात गाणारी लीला. अनुताई किंवा मी. महाराष्ट्रातल्या लोकनृत्यांची अधून मधून पेरणी. देव पावला देव माझा मल्हारी हे कोळीगीत. नाचणाऱ्यात रामनगरकर.
 महाराष्ट्राला सुफलित करणाऱ्या नद्या. कृष्णा तापी, गोदावरी, प्रवरा, भीमा... त्यांची वैशिष्ट्ये अवघ्या दोन ओळीत रेखाटनारे भरतनाट्यम शैलीवर वर आधारित अतिशय देखणे नृत्य. तारपा या वाद्यावरचे आदिवासी नृत्य.
 महाराष्ट्राला अस्मिता देणारे म. फुले, आगरकर, टिळक आदींची त्यांच्या विशिष्ट वाक्यांच्या अभिव्यक्तीतून झलक. केशवसुतांच्या नव्या मनूचा शिपाई' या कवितेचे समुहाने सादरीकरण. बालकवींची 'कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई.' ही चांदण कविता नृत्यातून सादर.
 मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली. कोकणातली अनेक कुणबी समाजाची मुले 'रामागडी' होऊन मुंबईत येतात. इथेच संसार थाटतात. होळी... रंगपंचमीच्या काळात ते महाभारतातली सोंगे घेऊन घरोघर फिरतात. त्यांचे बालीनृत्य सादर केले जाई. अर्धी विजार, वर चटेपटेरी बनियन, गळ्यात रंगीबेरंगी रूमाल, पायात घुगरु. हे

२४ / रुणझुणत्या पाखरा