पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रणरणत्या उन्हात तापलेला माळ. धगधगणारे जळते डोंगर. रानोमाळ भटकणारी गुरे नि माणसे. वणवण. का? भूक भागवणाऱ्या बरबड्याच्या दाण्यांसाठी! बरबडा हे दाणे देणारे रानगवत ...आगाताच्या सुगीचे १९७० साल बिनपावसाचे उलटले. पाठोपाठ १९७१ ही तसेच. १९७२ ची आशा होती. पण तेही तोकड्या पावसाचे. अवघा मराठवाडा दुष्काळाने हैराण. होरपळणारी. खंगलेली जनावरे कत्तल खान्याच्या दिशेने नेणारे उदास शेतकरी. गंगथडीचा पट्टा सोडला.तर इथून तिथून तीच तऱ्हा.
 बीड जिल्हा तर कायमचा तहानलेला. दुष्काळी. आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण परिसरातील हजारो कुटुंबांनी भाकरीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सुरत असे रस्ते धरले. घरादाराला कडी घालून, चिरेबंदी वाडा मोकळा सोडून. देशमुख पाटलाच्या घरातल्या मध्यमवयीन बाया हळदीकुंकवाच्या निमित्ताने वलगट पांघरुन घराबाहेर पडणाऱ्या. त्या पितळी टोपली घेऊन रोजंदारीच्या कामावर, दगडमाती भरून एकमेकींना देऊ लागल्या. घरची म्हातारी कोतारी दीड दोन एकर रान.. शेत सांभाळण्यासाठी. दारात बसवली गेली.
 ...१९४७ साली आम्ही स्वतंत्र झालो. १९५२ साली जात, धर्म, लिंग निरपेक्ष समतावादी स्वतंत्र राष्ट्राची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. आमच्या हक्कांचे, अधिकारांचेक नेमके अर्थ समजून घेतांना नागरिक म्हणून कर्तव्यांची माहिती जाणून घेण्याचे भान मात्र सुटून गेले. आमच्या

रुणझुणत्या पाखरा / १९