पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "भैय्याच्या मैत्रिणीचा मुलगा स्पॅस्टिक म्हंजी डोकं पावरबाज पन अंग वाकडे तिकडे, असा हाय म्हने. तिथे बाई पायजे असे भैय्या म्हनले होते. मी जाया तयार हाय. लई मायेने करीन लेकराचं मी. ताई मी बी पन्नास वरसांची झाल्ये की. अजून बारा-पंधरा वरसं उमेदीनं काम करीन, पन फुडे काय ? मी येकटीच. ताई, म्हातारपन येकटीनंच काढायचं का हो? लई रिकामं रिकाम वाटतंय आताच. हे जगणं म्हंजी एक सपन नाहीतर भासच का वो?"
 थोडा वेळ निस्तब्ध शांतता. 'येते ताई' असं म्हणून ती निघून गेली.

आला श्वास... गेला श्वास... एक भास!
हवेत विरलेले असे लक्षावधी भास...


रुणझुणत्या पाखरा / १६५