पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फोडतात त्या दगडाला अष्मा म्हणतात. आज एकविसाव्या शतकात मृत जीव कावळ्यात जाणे, पिंडाला कावळा शिवला तर आत्म्याला मुक्ती या कल्पनांवर विश्वास न ठेवणाऱ्यांची, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवाच्या मृत्यूची चिकित्सा करणाऱ्यांची, मृत्यूनंतर शरीरदान, दृष्टिदान, मूत्रपिंडदान करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. वैज्ञानिक दृष्टी स्वीकारताना आपल्या वर्षानुवर्षे सतत ताजेपणाने टिकलेल्या परंपरांचा चिकित्सक नजरेने शोध घेणेही महत्त्वाचे आहे. त्यातील चिरंतन संकल्पनांचा शोध नव्याने पुढे जायला प्रेरणा देणारा आहे.

१६२ / रुणझुणत्या पाखरा