पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेडाबागडा भाऊ बहिणीला असावा
चार आण्याची चोळी एका रात्रीचा विसावा...

 खणकणाऱ्या काचेच्या बांगड्या घालून, झाडाला बांधलेले झोके... स्वप्नांचेही, आभाळाला भिडवताना तिने मनातली चिरंतन व्यथा आभाळाला नोंदवली. आज काळासोबत सासर माहेरच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. तरीही

सासराच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे गुलाल-बुक्का दाटे...

 या ओळी ऐकल्या की बाईचे मन भरून येतेच नाही का? शेवटी माहेर ते माहेर!

रुणझुणत्या पाखरा / १५३