पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अण्णांचे शेवटचे आजारणपण जीवघेणे होते. मुळातच झुंजार पिंड असल्याने ते आजाराची फिकीर करीत नसत. डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य... विशेषतः माणसांना न भेटण्याचे, न बोलण्याचे पथ्य ते पाळत नसत. आयुष्यात येऊन गेलेले अनेक उन्हाळे, हे विचित्र आजारपण, औषधांचे परिणाम, यामुळे अण्णाची प्रतिकार शक्ती क्षीण झाली होती.
 अण्णा. संपूर्ण मराठवाड्यात वेढून राहिलेल्या बालाघाटाच्या डोंगरासारखा मजबूत सावळा बांधा. त्याहीपेक्षा कणखर आणि टणक मन. लेखणीही तशीच लखलखित. पण आतला गाभा मात्र गाभुळा. रसदार. अण्णांची तब्बेत विचारण्यासाठी स्वैपाकघरात काकू नाहीतर सुषमाकडे जायचे. पण जरा आवाजाची चाहूल लागली की, 'काय ग, शैला आलीये का?' अशी विचारणा होई. अपराध्यासारखी उंबरठ्याजवळ जाऊन मी म्हणे.
 'अण्णा, काकूंकडे आले होते, तुम्ही विश्रांती घ्या.' 'अग ये, डॉक्टरनी पार पंचाईत केलीय माझी. काही होत नाही. बस' अण्णांचे बोलणे सुरू.
 "द्वारकादास कसा आहे? त्याची मान कशी आहे? आमचा सबनिस काय म्हणतो? भिकाभाऊ कसे आहेत ?' माझा गोंधळलेला चेहेरा पाहून, 'अग तुमचे राखे गुरूजी.' मग योगेश्वरी शाळेतील जुनी मंडळी, मानवलोकचे काम, अशा वळणांनी

रुणझुणत्या पाखरा / १२९