पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 ४० वर्षांपूर्वी आम्ही जोशात दिलेल्या 'हिंदी चिनी भाई भाई' या घोषणा हवेत विरताहेत तोच चिन्यांनी आमचा हिमालय बळकावण्याचा घाट घातला. हिमालयात घुसखोरी केली. पुन्हा आम्ही बुलंद आवाजात सांगू लागलो... गाऊ लागलो... म्हणू लागलो,
 उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू!
 पण आमच्या शासनाजवळ ना बर्फ तुडवू शकणारे उत्तम बूट होते, ना आवश्यक ती शस्त्रे, स्वेटर्स. तरीही जीवाची बाजी लावून आमचे जवान लढले. आजही,
 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँखमें भरलो पानी
 जो शहीद हुवे है उनकी, जरा याद करो कुर्बानी -
 ह्या लतादिदींनी गायलेल्या प्रदीपजींच्या गीताचे स्वर ऐकले की मन गलबलतं. डोळे वाहू लागतात. तो हिमालय प्रत्यक्ष अनुभवण्याची लालसा गेली पन्नास वर्षे मनात जपून ठेवली होती आणि वयाची सत्तरी जवळ आल्यावर तो योग अंगणात आला. ही उत्सुकता अधिक ताणली गेली, नेपाळला गेलो तेव्हा. हिंदू धर्मः त्यातील स्त्रिया व मुलांचे स्थान या विषयावर मी टिपण वाचणार होते. पाकिस्तान सिलोन, बांगलादेश, दक्षिण आफ्रिकेतील काही देश सहभागी होणार होते. ख्रिस्तवासी डॉ. मेबल आरोळे व डॉ. रजनीकांत आरोळेंमुळे ही संधी मला मिळाली होती, काठमांडू ते दिल्ली हा संपूर्ण

रुणझुणत्या पाखरा / १११