पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 सेंट जॉनचा किनारा. दिवसभलेही मे महिन्यातले असले तरी संध्याकाळीही काकडवणारी थंडी होती. न्यू फाऊंडलंड हा उत्तर कॅनडातला चिमुकला प्रांत. अटलांटिक महासागरातील भरतीच्या लाटांत अंग भिजवून नव्या समुद्राचे वेगळेपण अनुभवीत होते. इतक्यात 'मावशी शार्क..' अशी मधुश्रीने साद घातली. प्रचंड आवाढव्य असे माशाच्या आकारचे धूड वेलांटी उडी घेत क्षणभर पाण्याबाहेर हवेत उडून परत समुद्रात गडप झाले. सात वर्षात मधुश्रीला सेंटजॉनमध्ये राहून शार्कचे दर्शन झाले नव्हते. मला ते अनोखे अभूतपूर्व दर्शन पहिल्या दिवशीच झाले. अटलांटिक महासागराची ओळख पक्की झाली.
 सेंटजॉन हे मासेमारीचा व्यवसाय करणारे शहर, अटलांटिक महासागरात पाय सोडून निवान्तपणे बसले आहे. इंग्लंडच्या मार्कोनीने पहिला ट्रान्सॲटलांटिक संदेश इथेच पाठविला होता. या देखण्या शहराच्या किनाऱ्यावर कॉड माशांची भरपूर पैदास होत असे. या शहराजवळच पेटी हर्बर नावाचे चिमुकले खेडे आहे. गेली तीन साडेतीनशे वर्षे हे खेडे याच व्यवसायावर जगते. प्रत्येक घरासमोर रंगीतबोट बांधलेली असते. पुरूष ऊफाळत्या सागरात बोटी फेकून चंदेरी माशांची दौलत घरी आणतात. त्यांची साफसफाई, काटे काढून, त्यावर प्रक्रिया करण्याचे काम त्यांच्या घरधनिणी करतात. उधाणलेल्या सागरातून घरधनी सुखरूपणे परत येण्याची वाट पहाणाऱ्या त्यांच्या राण्यांनी एक उमाठ्याची जागा निवडली होती. तिला 'सी लुक आऊट'... दूरवरचा

रुणझुणत्या पाखरा / १०५