पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 चीनच्या जमिनीवर पाय ठेवले नि आमच्या आवाजातला जोश वाढला. घोषणांची नारेबाजी घुमवीत आम्ही चीनच्या शिस्तीत वाढलेल्या चौकटबंद विमानतळालाही गोड धक्का दिला. पिवळट गोऱ्या, मुखवटेवजा चेहऱ्यांच्या डोळ्यातून उत्सुकता... हसरेपणा... डोकावू लागला.
 'इंडो?...इंडू? तुम्ही भारतातल्या का? ते हसरे डोळे विचारीत. चीनमधली जणू अख्खी तरूणाई आमचं स्वागत करायला सज्ज झाली होते. दीड तासाचा बसप्रवास करून आम्ही हुॲरोच्या स्वागतकक्षाजवळ उतरलो. संध्याकाळची वेळ. भव्य रस्ते. हिरव्यागार उंचच उंच झाडांनी आणि मंदप्रकाशी दिव्यांनी स्वागत करणारे. जिकडे तिकडे रंगी बेरंगी झुळझुळते थवे. गोरे... पिवळे... सावळे... काळे गुलाबी रंग एकमेकात मिसळणारे. अप्रतिम निवासव्यवस्थेची सुनिश्चिती यांची कागदपत्रे होतीच. नोंदणी क्रमांकाचा शेवटचा आकडा पाहून त्या त्या नोंदणी कक्षापुढच्या ओळीत उभे राहण्याची सूचना दिली जात होते. आणि अक्षरश: अवघ्या काही मिनिटात आमची व्यवस्था केलेल्या ठिकाणचा पत्ता, आमचे नोंदणी 'मंगळसूत्र' जे आम्ही लगेच गळ्यात अडकवले आणि मार्गदर्शक सूचना पत्रके इत्यादींनी भरलेली सुरेख पिशवी घेऊन इमारतीच्या बाहेर पडलो. खिशाला परवडेल अशा सर्वात स्वस्तातल्या जागेत राहण्याचे आम्ही ठरवले होते. तिथेही आश्चर्याचा सुखद धक्का. तिथे डॉ. रूपा शहा आधीच

रुणझुणत्या पाखरा / ९१