पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जुईलीची तर दोन झुडपे... बैठ्या पसरट वेली अंगणात आहेत. वेली फुलायला लागल्या की माझ्या नाती, लेकी, सुना गजरे गुंफतात. माझ्या समोर गजरा ठेवतात. तो माळायला आज डोक्यावर केस नाही पण त्या सुगंधाने पुन्हा माझ्या डोक्यावर कुरळ्या केसांची झालर झूलू लागते... आणि सुगंधाच्या वादळांत मी हरवून जाते.

९० / रुणझुणत्या पाखरा