पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे खऱ्या अर्थाने समान नागरिकत्वावर आधारलेली बहुधर्मीय समाजव्यवस्था इंडोनेशियात अस्तित्वात आहे. याचे श्रेय इंडोनेशियाच्या इतिहासातील इस्लामीकरणाच्या शांततामय प्रक्रियेला द्यावे लागेल. या प्रक्रियेत एकही देऊळ फोडले गेलेले नाही. आणि इंडोनेशियाच्या संस्कृतीत सखोल रुजलेल्या हिंदू परंपरांचा त्याग करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. धर्म लादला गेला नाही त्यामुळे वेगळी संस्कृती लादली जाण्याचा प्रश्न नव्हता. त्याचबरोबर इंडोनेशियातील इस्लामीकरणाच्या प्रक्रियेत मुस्लिम बहसंख्यांक झाले आहेत हेही इंडोनेशियन इस्लामचे हिंदू धर्मावर कलम यशस्वी होण्याचे एक कारण आहे. त्या देशात प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारा तोच एक प्रचंड समाज बनला. त्याला आपले वेगळे स्वरूप निर्माण करण्याची गरज निर्माण झाली नाही. (इराण किंवा इजिप्त या देशांतील मुसलमान आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगतातच. भारतात प्राचीन परंपरेपासून अलग होण्याची मुसलमानांची धडपड आहे. ते अल्पसंख्यांक आहेत आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारा हिंदू समाज बहुसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहे. इंडोनेशिया आणि भारत यांच्यामधील मुसलमानांच्या वेगळ्या सांस्कृतिक परंपरांमागे ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे.)
 जवळजवळ सर्वच मुसलमान प्रजासत्ताकांच्या घटनेनुसार राष्ट्रप्रमुख मुसलमानच होऊ शकतो. इस्लामच्या आदर्श तत्त्वांनुसार कारभार करण्याची किंवा समाजव्यवस्था निर्माण करण्याची मार्गदर्शक तत्त्वे या प्रत्येक घटनेत नमूद केलेली आहेत. (मुस्लिम राष्ट्रातील राष्ट्रवादाच्या स्वरूपाविषयी अधिक विवेचन रोझेन्थॉल यांच्या "Islant in Modern National State" या पुस्तकात.) बिगरमुसलमानांना धर्मप्रसार करण्याची बंदी आहे. (फक्त पाकिस्तानच्या घटनेने सर्वधर्मीयांना धर्मप्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पाकिस्तानच्या घटनेतील या उदार दृष्टिकोनाचे रहस्य समजणे कठीण नाही. कारण तेथे प्रमुख अल्पसंख्यांक हिंदू समाज आहे आणि तो धर्मांतर करून घेत नाही. जेथे ख्रिश्चनांसारख्या प्रसरणवादी समाजाशी स्पर्धा करावी लागते तेथे इतरांना बंदी आहे. त्याचबराबेर पाकिस्तानमध्ये आदर्श इस्लामी समाजव्यवस्था स्थापन करण्याचे मार्गदर्शक तत्त्वही घटनेत अंतर्भूत करण्यात आले आहे.) मलेशियात भिन्नधर्मीय विवाहाला कायद्याने बंदी आहे. दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना विवाह करावयाचा असल्यास त्यापैकी एका व्यक्तीला आपला धर्म बदलावा लागणे अपरिहार्य आहे आणि कायद्याने मुसलमानांच्या धर्मांतराला बंदी असल्यामुळे बिगर मुसलमान व्यक्तीला मुसलमानाशी विवाह करावयाचा असल्यास त्याने किंवा तिने मुसलमान होणे आवश्यक आहे. थोडक्यात धर्मप्रसार कायद्याने करण्याची मलेशियाच्या घटनेतील तरतूद खास इस्लामी आहे. अल्जेरियाच्या साम्यवादाला इस्लामचे रूप राहिले असे बेन बेला यांनी घोषित केले होते.

 असली तरी पाकिस्तानपासून मोरोक्कोपर्यंत पसरलेला हा प्रदेश सलग आहे आणि एवढ्या प्रदेशात पसरलेला हा समाज आपण जणू एकाच इस्लामी राज्याचे समान नागरिक आहोत असे मानसिकदृष्ट्या मानतो. (अल् अक्सा मशिद जळाल्याच्या प्रकरणावरून सर्व इस्लामी जगतात उठलेली प्रक्षोभाची लाट, नायजेरियातून बायफ्राने फुटून निघावयास सर्व

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३७