पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निंदा केलेली आहे. बांगला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला सतत विरोध केला. पाकिस्तानच्या मध्यवर्ती राजवटीचे उघडउघड़ समर्थन केले. हे सर्व करीत असताना इतर सर्व मुस्लिम नेते आणि बद्दिन तय्यबजीसारखे जातीयवादी मुसलमान यांच्याप्रमाणे 'भारत युद्ध करणार नाही, बड़ी राष्ट्र भारताला युद्ध करू देणार नाहीत व पाकिस्तान दुभंगणार नाही' असे 'नशेमन' चे संपादक गृहीत धरून चालले होते. परंतु बांगला देशच्या विजयाने हे सर्व आडाखे कोसळल्यांनतर कोलांटउडी मारणे क्रमप्राप्तच होते. बद्रुद्दिन तय्यबजी यांनी रेडियन्स'मध्ये लेख लिहून 'युद्धात पंतप्रधान जशा थोर ठरल्या तशा उपखंडात शांतता निर्माण करण्याच्या कामीही थोर ठरतील' अशी आशा व्यक्त केली. तय्यबजी यांना लागलेली शांततेची तळमळ आपण समजू शकतो. यावेळी पश्चिम पाकिस्तानचा बसच प्रदेश भारताच्या हाती आला आहे, तो परत दिल्याखेरीज़ पंतप्रधान शांततेचे पाईक ठरणार नाहीत असे बद्रुद्दिन तय्यबजी यांना सुचवायच्ने होते. पाकिस्तानच्या या प्रदेशात आपण अनेकदा प्रवास केला आहे, नोकरीनिमित्त तेश्चे होतो. तेथील सर्वसामान्य माणसे भारतातील सर्वसामान्य माणासाइतकीच निरागस व चांगली : वाटली, असेही त्यांनी पाकिस्तान्यांना शिफारसपत्र दिले आहे. वास्तविक कुठल्याही प्रदेशातील सर्वसामान्य माणसे निरामस व चांगलीच असतात. याला रशियन, जर्मन अथवा अमेरिकन माणसेही अपवाद ठरणार नाहीत. कारण शांततेच्या नियमित काळात माणसाचे पशुल्व झोपी मेलेले असते. त्यामुळे माणसे ही माणसे' म्हणून वागतात. हीच माणसे अनियमित काळात अशी वागली यावरून त्यांचे स्वभावविशेष ठरवायचे असतात. जर्मन माणसानी युद्धकाळात साठ लाख निरपराध ज्यूंना ठार केले ही बाब जर्मनांचे स्वभावविशेष ठरविताना विचारात घ्यावी लागते. म्हणूनच स्टॅलिनने केलेल्या दुष्कृत्यांच्या पार्श्वभूमीवर रशियन माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांची चर्चा केली जाते आणि मॅक्झिम गॉर्कीसारखा लेखक याकरिताच 'Cruelty is a main character of a Russian' असे सहजगत्या म्हणून जातो. पाकिस्तानी जनतेचे स्वभाववैशिष्ट्य बांगला देशात पाकिस्तानी राजवटीने केलेल्या हत्याकांडाच्या संदर्भात आणि अल्पसंख्यांकांच्या झालेल्या संपूर्ण हकालपट्टीत अजमावावे लागते. कारण या अत्याचारांना पाकिस्तानी जनतेने उत्साहाने पाठिंबा दिलेला आहे. श्री. बद्रुद्दिन तय्यबजीची रंगसफेती हे स्वभावैशिष्ट्य लपवू शकत नाही.
 परंतु 'नशेमन' ने अशी रंगसफेतीही केलेली नाही. 'बांगला देशचा विजय असो' अशी सरळ घोषणाच या पत्राने बांगला देश स्वतंत्र होताच दिली. 'नशेमन'ची पुढील प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. “भारतीय मुसलमानांच्या स्वार्थत्यागाने बांगला देश स्वतंत्र झाला."

 बांगला देशाच्या उदयानंतर उपखंडातील एकूण सत्तासमतोलच बदलून गेला. पहिली गोष्ट अशी की हे युद्ध निर्णायक ठरले. पाकिस्तानचे सुमारे एक लाख सैनिक शरण आले. यामुळे विजय कुणाचा झाला यावर वाद घालणे मुस्लिमांना शक्य झाले नाही. मुसलमानांच्या शूरत्वाच्या कथाही या युद्धानंतर ऐकायला मिळाल्या नाहीत. माझ्या ओळखीचा एक मुसलमान तरुण कामावर न जाता तीन दिवस उपाशी घरी बसला होता. मी एकदा घरी गेलो तेव्हा तो कुठे बाहेर गेला होता. त्यांची आई म्हणाली, "डाक्का फका होनेसे उसको बहुत दुख हुवा। खानातक नही खाता।" माझे एक दुसरे मुस्लिम मित्र युद्धातील विजयानंतर पेढे

१६०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान