पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटत सुटले. आपल्या हिंदू मित्रांबरोबर त्यांनी ओळखीच्या मुस्लिम मंडळींनाही पेढे नेऊन दिले. एका मुस्लिमाने त्यांना विचारले, “तुमको खुशी होनेकी क्या जरूरत है?" एक मुस्लिम सद्गृहस्थ मला युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणाले, “सर्व मुस्लिम राष्ट्रांचे मिळून एकूण सैन्य दहा लाख आहे व त्यांच्यापाशी तीन हजार रणगाडे आहेत व दोन हजार विमाने आहेत. हे सर्व एकत्र येऊन हिंदुस्थानवर तुटून पडतील." अमेरिकेचे सातवे आरमार चितगावच्या दिशेने येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक मुस्लिम मंडळी टवटवीत बनली होती.. एकजण म्हणाले, “अब सातवाँ बेडा आ रहा है। चायनाबी मैदानमें उतर रहा है। अब देखें कैसा मुकाबला करते हैं।"

 ही उदारहरणे या प्रश्नावरील मुस्लिम मनोवृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी दिली आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जरुरी आहे असे वाटत नाही. जे सुशिक्षित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया अर्थात अत्यंत सावध व मुलायम भाषेत व्यक्त होत असतात. बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर बिहारी मुसलमानांच्या कत्तली होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्याबरोबर मुजिबचा निषेध करण्याची संधी अब्दुल गफूर नूराणीपासून 'रेडियन्स' व 'नशेमन' पत्रापर्यंत सर्वांनी साधली. नूराणींनी मुलायम भाषेत बिहाऱ्यांवरील आपले प्रेम व्यक्त केले व बिहारी मुसलमानांवरील प्रश्नाच्या वादात बांगला देश व पाकिस्तान यांच्यात भारताने तडजोड करावी असे सुचविले. नूराणींना, थोडक्यात, बिहारी मुसलमानांना पाकिस्तान व बांगला देश घ्यावयास तयार नसल्यास भारताने घ्यावे असे बहुतेक सुचवायचे असेल. देशाच्या उदयानंतर भारतात अनेक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधानांवर दडपण आणण्यासाठी बिहारी मुसलमानांच्या प्रश्नांचा उपयोग मुस्लिम जातीयवादी पक्षांनी केला. बिहारी मुसलमानांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही, काही मुस्लिम मतदारांनी मला मते दिली नाहीत तरी त्याची मला पर्वा नाही असे स्पष्ट उद्गार पंतप्रधानांनी रांची येथील एका प्रचारसभेत काढल्याने पंतप्रधानांवर दडपण आणण्याचा प्रयत्न मुस्लिम जातीयवादी मंडळींना सोडून द्यावा लागला. बांगला देशमध्ये हळूहळू दबलेल्या जातीयवादी शक्ती डोके वर काढू लागलेल्या आहेत याचा झालेला आनंद मुस्लिम जातीयवादी पत्रांनी लपविलेला नाही. रेडियन्स'ने म्हटले आहे, बांगला देशाची.सर्व जनता मुजिब यांच्या मागे.असल्याचे जे दिसत होते ते खरे नाही, हे अलीकडे ज्या घटना घडून येत आहेत त्यावरून दिसून येते. पाकिस्तानवर निष्ठा असलेला असा एक वर्गदेखील तेथे आहे. सिमला करार होण्याच्या आधी पाकिस्तानशी भारताने बोलणी करावी ही भूमिका मुस्लिम वृत्तपत्रे आणि नेते यांनी मांडली होतीच. सिमला कराराचे सर्व मुस्लिम वृत्तपत्रांनी, नूराणी व तय्यबजी यांच्यासारख्या पाकिस्तानवादी राजकीय लेखकांनी आणि सर्व मुस्लिम संघटनांनी स्वागत केले. सिमला कराराचे अनेकांनी स्वागत केले आहे. परंतु मुस्लिम वृत्तपत्रे आणि संघटना यांची भूमिका आणि इतरांची भूमिका यांच्यात काही साधर्म्य नाही. इतरांच्या मते प्राप्त परिस्थितीत बड्या राष्ट्रांचा हस्तक्षेप टाळून उपखंडातील गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी घेतलेला हा एक पवित्रा आहे. एक राजकीय डावपेच म्हणून सिमला करार अनिवार्य होता. पाकिस्तानचा प्रदेश दिल्याने आपण आपले काही गमावत नव्हतोच. मात्र काश्मीरमध्ये जिंकलेला प्रदेश राखून

भारतीय मुसलमान /१६१