पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नमुनेदार देत आहे. जेथे पाकिस्तानला दोष देणे टाळता येणे शक्य नाही तेथे भारतालाही दोष देऊन दोन्ही देश सारख्याप्रमाणात दोषी आहेत असे दाखविणे ही नूराणींची आणखी एक हातचलाखी आहे. भारतीय मुसलमानांच्या पाकिस्तानी चळवळीबद्दल दिल्ली येथे भरलेल्या १९६४ च्या राष्ट्रीय अधिवेशनात श्री. मोरारजी देसाईंनी उल्लेख केला होता. यांविषयी लिहिताना श्री. नूराणी म्हणतात, “भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली म्हणून त्यांच्या निष्ठेबद्दल संशय बाळगायचा तर पाकिस्तानही आपल्या हिंदू अल्पसंख्याकांच्या निष्ठेचा प्रश्न उपस्थित करू शकेल." (पहा - 'India's Constitution and Politics', ले. .. ए. जी. नूराणी पृ. ३६२-६३ जयको पब्लिशिंग हाऊस, मुंबई १९७०) श्री नूराणी यांनी या प्रतिपादनात अनेक लबाड्या केल्या आहेत. पहिली लबाडी अशी की पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना मिळणारी वागणूक आणि भारतीय अल्पसंख्यांकांना मिळणारी वागणूक जणू समान आहे असे भासविले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्तानातून ५०% हिंदूंना भारतात हाकलून दिलेले आहे. दुसरी लबाडी अशी की पाकिस्तानात हिंदूंच्या निष्ठेचा प्रश्न पाकिस्तानचे नेते आणि वृत्तपत्रे उपस्थित करीत नाहीत, त्यांच्यावर जणू संपूर्ण विश्वास टाकण्यात आला आहे आणि पाकिस्तानच्या राजकीय जीवनात सहभाग घेण्याची संधी त्यांना संपूर्णपणे देण्यात येत आहे असे नूराणींनी येथे भासविले आहे. नूराणींच्या आणि वाचकांच्या माहितीसाठी मी 'डॉन' मधील अग्रलेखाचा एक उतारा पुढे उद्धृत करतो.
 “नेहमी भारतात भारतीय मुसलमानांना मंत्रिपदे देण्यात येतात व पाकिस्तानात हिंदूंना अधिकाराची पदे देण्यात येत नाहीत हा आरोप करण्यात येतो. परंतु ही तुलना चुकीची आहे. श्री. रफी अहमद किडवाई अथवा मौ. आझाद ही मंडळी पाकिस्तानच्या चळवळीची विरोधक होती व काँग्रेसच्या ध्येयप्रणालीशी समरस झालेली होती. पाकिस्तानच्या चळवळीशी ‘समरस झालेली एक तरी हिंदू व्यक्ती आपल्याला आढळते काय?" थोडक्यात, पाकिस्तानी चळवळीशी पाकिस्तानी हिंदू समरस झाले नाहीत म्हणून त्यांना आम्ही समानतेने वागविणार नाही. भारतीय स्वातंत्र्यचळवळीशी काही मुसलमान समरस झाले होते. त्यामुळे त्यांना आपण समानतेने वागविलेत याचे फारसे कौतुक करण्याचे कारण नाही, असा हा उफराटा युक्तिवाद आहे. नूराणींची तिसरी लबाडी अशी की मोरारजींच्या उद्गारांचा त्यांनी जो उल्लेख केला आहे तो विपर्यस्त आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम जातीय चळवळींचा मोरारजींनी उल्लेख केला आणि या संदर्भात स्वातंत्र्यपूर्वकालीन चळवळींचा उल्लेख करून हिंदूंच्या मनात निर्माण झालेल्या मुस्लिमांविषयींच्या अविश्वासाबद्दल ते बोलले. हे सविस्तर न लिहिता मोरारजी जणू एकेकाळी मुसलमानांनी पाकिस्तान मागितले म्हणून त्यांना दोषी ठरवीत आहेत असे भासविण्याचा खोटा प्रयत्न नूराणींनी केला आहे. (श्री. मोरारजी यांची संपूर्ण भाषण पहा.)

 येथे नूराणींच्या सविस्तर लिखाणाचा आढावा घेण्याचे कारण नाही. मात्र काश्मीर प्रकरणी नूराणी यांनी पाकिस्तानच्या वतीने येथे लॉबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काश्मीर प्रश्नावर त्यांनी जे एक पुस्तक लिहिले आहे त्याच्याकडे लक्ष देणे योग्य ठरेल. (पहा-नूराणी यांचे पुस्तक 'The Kashmir Question' मानकतला

१४६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान