पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भक्तीच्या माध्यमातून देशाचा उत्कर्ष घडवून आणावा. गुलामगिरीतून भारतमातेला मुक्त करावे हा त्यांचा संकल्प होता. देवभक्ती बरोबरच राष्ट्रभक्तीची भावनाही त्यांच्यात रुजली. आणि ती संपर्ण समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी जीवनभर केला. देशभक्तीपर भजने गात गात खेडोपाडी, गावोगाव त्यांनी संचार केला. धर्मजागरण : 'संत ओळखावा वृत्तिवरून। अथवा सद्गुण पाहोनिया' संत तुकडोजी महाराजांच्या या उद्गाराचे मर्म आपण जाणून घेऊ या. संत सज्जनांची संगत त्यांनी स्वतः धरली आणि समाजालाही तोच संदेश दिला. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या माणसांनाच नेहमी जवळ करावे. हे लोकशिक्षणाचे कार्य संत तुकडोजींनी आपल्या भाषणातून, लेखनातून आणि गायनातून सर्व समाजापर्यंत पोहोचविले. त्यांचा 'गुरुकुंज' हा 'मोझरी' येथील आश्रम म्हणजे याच सद्विचारांचा महासागर बनला आहे. विदर्भात संत तुकडोजींच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र पसरलेला आहे. स्वराज्याचे सुराज्य झाले पाहिजे असा विचार त्यांनी अंमलात आणला. लोकांसमोर मांडला. त्यासाठी तुकडोजींनी ग्रामोद्योग, गोरक्षण, व्यायामशाळा, कृषिकेंद्र, दवाखाना, प्रशिक्षण प्रशाला, विद्यालय, वसतिगृह असे विविध प्रकल्प कार्यन्वित केले. विचारांची कास धरून तोच ध्यास घेतला की अशी कार्ये उभी राहतात. अतोनात