पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवभक्तीसह राष्ट्रभक्ती : संत तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ मध्ये विदर्भप्रांतातील ‘यावली' ता. अमरावती येथे झाला. 'आकोट' चे हरिबुवा आणि 'माधान'चे गुलाबराव महाराज यांची प्रेरणा आणि आशीर्वाद तुकडोजींना लाभले. संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव होते, “माणिक बंडोजी ठाकूर' या 'माणिक'चे शिक्षण फक्त तिसऱ्या इयत्तेपर्यंतच झालेले होते. माणिकला संत अडकोजी महाराजांनी 'तुकडोजी' हे नाव दिले होते. शिक्षणाचे महत्त्व आणि भेदभाव सर्व सोडा हे सांगणारा त्यांचा प्रमुख ग्रंथ म्हणजे 'ग्रामगीता' होय. स्वच्छतेचे महत्त्वही त्यांनी सर्वत्र सांगितले आहे. परधर्माबद्दलचा आदरभाव त्यांनी व्यक्त केला आहे. “लहान ऐशा गावामाजी। मागासलेल्या जनसमाजी। उपासाचीच लाभे रोजी। ऐशा ठायी जन्मलो। घरी दारिद्रयाचे वरदान। परिभाव भक्तीची नसे वाण। - ऐका सुसंस्काराचे गान। सोशित कष्ट वाढलो। वडील बंडोजी शिवणकाम करीत. आई घरकामाबरोबर दळणकांडण करी. कसाबसा प्रपंच सावरला जायी. बालपणीच भजनपूजन, धार्मिकता तुकडोजींना आवडत असे. तुका म्हणे प्रमाणेच 'तुकड्या म्हणे' हे नाव धारण करेल असे म्हणूनच त्यांनी आपले मौलिक विचार मांडले आहेत - तुकड्या नावाने लोकी मी खेळलों। उजेडिया आलो तुकडे खाता।।