पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कष्ट घेऊन त्यांनी आपल्या विचारधारेनुसार या प्रकल्पांची पूर्तता केली. आज मूर्त स्वरुपात संत तुकडोजींच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र जाणवतो आहे. या राष्ट्रसंतांच्या विचारात समाजाभिमुखतेला प्राधान्य होते. म्हणूनच त्यांनी अध्यात्म साधना सामूहिक भजनातून सर्वांसह केली. ढोल, शंख, खंजिरी, एकतारी या वाद्यांच्या तालावर कीर्तनातून आणि भजनातून त्यांनी आपल्या विचारांची पेरणी केली. समाजात धर्माचे लोकजागरण केले. भारत साधु-समाज : 'भारत साधु-समाज' स्थापन करून, अखिल भारतीय पातळीवर विचारवृष्टी करून, संत तुकडोजी महाराजांनी जनजागरण केले. झाड-झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना। पत्थर सारे बॉम बनेंगे, नाव लगेकी किनारे।। त्यांच्या वा कवनांमध्ये इंग्रजांच्या विरोधातल्या १९४२ च्या चळवळीतला आपला सहभाग नोंदविला आहे. यातूनच त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यांची प्रेरक, स्फूर्तिदायी, देशभक्तीपर गीते अजरामर झाली आहेत. या पंक्तीत ते म्हणतात. वेळप्रसंगी देशासाठी आमची भक्तमंडळीच सैन्याचे रूप धारण करील आणि आमच्या हातात स्वच्छतेसाठी घेतलेला झाडुसुद्धा शस्त्रास्त्राचे रूप धारण करील. इंग्रजांच्या विरुद्धाच्या त्वेषाने इथले दगडधोंडे सुद्धा स्फोटक बॉम्ब (७)