पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- .. असा रोकडा, खडा सवाल त्यांनी जवानांना, तरुणांना विचारला आहे. इंग्रज सावध झाले, त्यांच्याविरुद्ध तुकडोजी रान उठवीत होते म्हणून २८ ऑगस्ट, १९४२ ला तुकडोजी महाराजांना तुरुंगात टाकण्यात आले. ७४ दिवस त्यांना कारावासात ठेवले. पण नागपूर विदर्भ जनता खवळून उठली. कारागृहाला तुकडोजी 'श्रीकृष्ण मंदिर' म्हणत. तुकडोजींचे जीवन विषयक चिंतनही मोलाचे आहे. 'संसाराचा बोझ वाहता। टेकलासे मरणाला, नेसी साथी कुणाला।' 'आसक्तीचा बंध तोडून, तू देवाची लीला बघा, सरणाच्या वाटेवर माणूस सहज चालता चालता केव्हा पोहचतो तेही कळत नाही, म्हणून गरिबांची जाणीव ठेवावी. सत्संग, दान, धर्म या गोष्टींना आयुष्यात महत्त्व द्यावे. षड्रिपूंच्या मेळ्यात आपण अडकून न पडता भक्तीचाच आधार खरा हे लक्षात घ्यावे. म्हणून ते कळवळून सांगतात - ऐका हा भाव जीवाचा। भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा। तुकड्या दास म्हणे ऐका ना। नित्य प्रभूचे भजन करा ना। व्यसने सगळी सोडूनी द्या ना। सरळपणाने जीवन जगा ना। लोभ करा सर्वांचा।.... दुसऱ्या एका भजनात ते म्हणतात..... कां भ्रमलासी, कां भ्रमलासी। जा शरण गुरुपायासी।। हाच त्यांचा आपण संदेश काळजात जपून ठेवावा असा आहे. - (४८)