पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मरणाचे दुःखही नाहिसे होते, सौख्याचे राज्य प्राप्त होते. 'विश्वची घर भासूनी। जीव हा होत सदा दंग।' । शेवटी 'तुकड्या म्हणे नुरे व्यंग' अशी उन्मनी अवस्था प्राप्त होते. या कार्याच्या प्रसार प्रचारासाठी त्यांनी 'गुरुदेव सेवा मंडळाचे जाळे उभारले होते. 'मोझरी' चा आश्रम त्याचप्रमाणे नागपूर जवळील काटोल रस्त्यावरील 'मानव मंदिर' तुकडोजींच्या कार्याचा लौकिक वाहवीत आहेत. याच आश्रम, मंडळ, मंदिरांच्या माध्यमातून तुकडोजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनाबरोबरच राष्ट्रप्रेम जागविले. महात्मा गांधींच्या आश्रमातही त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात आपल्या भजनांची सामुदायिक प्रार्थनेला जोड दिली. राष्ट्रीय विचारसरणीने भारलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. समाजजागृतीसाठी त्यांच्या कार्याला आणि वाणीला बहर आलेला आहे. "प्यारा हिंदुस्थान है। गोपालो की शान है।। वीरोंका मैदान है। उसमें भक्तों के भगवान है।। . असा पुकार करून त्यांनी समाजाला आदेश दिला की 'आझाद करो दिल को अपनें, जो सूरज का प्रकाश करे।।' १९३६ ते १९४२ च्या कालखंडात संत तुकडोजी महाराजांच्या खंजिरीने भारतीय जनतेत राष्ट्रभक्तीभाव जागविला. लोकांना त्यांनी हिंदी काव्यातून सवाल केला आहे. 'हिंदूभूमी के पुत्रो तुम्हारे मुखमंडल ऐसे निस्तेज क्यों? उठो जवानो करके बनावो, अब कहने के दिन गये।' 'शेर हो तो चलो राह भी शेर की। कहे ते हो शेर तो। तो रीत क्यों भेड की?' - - - - - - - -- -- - - - - - -- -- -- - --- - -- - -- - - - - --- - - - -


- --- - - - - - ....... - - - - - - . (४७) -