पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपासकांना मौलिक संदेश : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनाच्या संदर्भातील मनोभावना भजन, गाणाऱ्यांनी आवर्जून समजून घ्यावी. तरच तुमच्या ईश्वरभजनाचे सार्थक होईल. तुकडोजी महाराज म्हणतात, 'सुखाचा मार्ग, जगाला पावो, निर्मळ ज्ञान, प्रवाहो, __ तुकड्यादास म्हणे, गुरुदेवा। भक्ति रमो, आमुच्या, जीवाभावा। वीर सदा विजयी हो। आणि 'सुखाचा मार्ग जगाला पावो।।' उपासकांनी, जर शब्दाशब्दांकडे, अर्थाच्या दृष्टीने पाहिले मनाच्या निर्मळ भावनेने पाहिले, तरच तुमच्याकडून खऱ्या अर्थाने भजन होईल. त्यातून तुमचा आत्मोद्धार होईल. आत्मोन्नतीचा हाच खरा धर्म मार्ग आहे. तुम्हांला मग हळूहळू क्रमाने त्यातला अनुभव येईल. महाराज म्हणतात, “भजन म्हणजे एका दैवीशक्तीच्या बागेमध्ये तुम्हांला विहार करायला लावणं होय, या दैवी शक्तीवर, भक्तिरूपी, सुगंधाचं आवरण घालणं होय. माणसाच्या मनातील विकार त्यामुळं संपतात आणि कळत नकळत विषयवासनेपासून मनुष्य दर जातो. 'नर करणी करे, तो नरका नारायण होय.' संतांना याच मार्गांनी नराचा नारायण करायचा आहे. हीच त्यांची सोपी पद्धत आहे. 'भजन' म्हणजे, दसरे तिसरे काही नसून, तुमच्या माझ्या, सर्वांच्या मनामनातील, अंत:करणातील परमेश्वराबद्दलची - - -- - - -- - ---