पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रह्मानंदी टाळी लागली। आता उरला एक गोविंद : गहिवरल्या कंठातून, वाहत्या नयनधारांतून संत तुकडोजी महाराज म्हणतात, “गोविंद म्हणा गोविंद। अवघेची धरा छंद।। 'अनुभवची संत स्वच्छंद। तुझ्या स्वरुपी सदा आनंद।।" सर्व भेदभाव विसरून, बंधन विसरून आपण हरिस्मरणात गढून जावे. मोहमाया भावना विषयवासना नाहिशी झाली असा हा सुखद स्वानंदाचा अनुभव, संत तुकडोजी महाराजांनी मुक्त मनाने अनुभवलेला भजनांमध्ये दिसून येतो. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मराठीप्रमाणेच हिंदी भाषेवरही प्रभुत्व आहे. म्हणून त्यांची हिंदी भजनावलींचीही एकूण २६ पुस्तके उपलब्ध आहेत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ज्ञान-दीप नावाचे २ भजनावली संग्रह, त्याचप्रमाणे भक्तिसुधा, वाचा-वल्ली, सुधा-सिंधू, आत्मप्रभा इ. काव्यपुस्तिका हिंदीत उपलब्ध आहेत. 'कधी येशील मनमोहना। घे धाव नंद नंदना।।' या भजनात मनमोहनाला भारत देश पाहण्यासाठी संत तुकडोजी पाचारण करतात. सगळी बंधने तोडून टाक आणि गरुडावर स्वार होऊन गरुडभरारी मार. श्रेष्ठ भक्तीचा रंग प्रगटवणारा हा सत्संग आहे. भक्त देवाच्या सेवेत इतके दंग होतात, की ते ब्रह्मच त्यांचे अंगांग होऊन जाते. सगळा अहंकार गळून पडतो. लोभ नाहिसा होतो. प्रेमाची भांग एकदा चढली की (४६)