पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकटकाळी उपयुक्त ठरणारे, दैनंदिन जीवनात लाभदायक, शिक्षण असावे अन्यथा ती विद्याचातुरी उपयोगाची नव्हे. 'विद्येअंगी व्हावा विनय। विद्या करी स्वतंत्र, निर्भय। शिक्षणाने वाढावा निश्चय। जीवन जय करावया।। यासाठी शिक्षण घेणे। की जीवन जगता यावे सुंदरपणे।।' वेळप्रसंगी धडाडीने प्रतिकार करणारी बलोपासक मुले शिक्षणाने घडावीत. पूर्वीच्या गुरुकुल ऋषिकालीन शिक्षणात हीच जीवन संथा शिकवण विद्यार्थ्यांना मिळत असे. चौदा विद्या आणि चौसष्ट कला या शिक्षणात समाविष्ट होत्या. उच्चशिक्षण खेड्यातच उपलब्ध झाले पाहिजे. आदर्श गाव निर्माण करणारे, सहकार्य देणारे. परस्परांना परक बनविणारे, जनसेवेचे प्रमाणपत्र प्राप्त करून देणारे, शिक्षण विद्यागुरूंनी द्यावे. शिक्षकांनी जबाबदारी ओळखून शिक्षण दिल्यास गाव सुधारेल. श्रमाची प्रतिष्ठा वाढेल. कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही. याला जीवन विकासाचे शिक्षण तुकडोजी म्हणतात. जीवन शिक्षणाचे गठबंधन व्हावे. विद्यार्थ्यांना तो ज्यात पारंगत होऊ इच्छित असेल ते शिक्षण घेऊ द्यावे तो पुढे ज्यात दिसे निष्णात। त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत।। (४५)