पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लाभदायक ठरणारेच आहेत. अत्यंत सडेतोडपणाने, रोकठोकपणे त्यांनी शिक्षणाबद्दलचे चिंतन ग्रामगीतेच्या या अध्यायात केलेले आहे. एका अर्थाने जीवन जगण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरलेल्या आजच्या शिक्षण पद्धतीचा खरपूस समाचार त्यांनी येथे घेतलेला आहे. शिक्षणाबद्दल आपल्या कशा चुकीच्या कल्पना रुढ आहेत हे त्यांनी प्रारंभी सांगितले आहे. यात शहरातच फक्त उच्च शिक्षण मिळते. 'खेड्यात अशा शिक्षणाचा आणि शिक्षिताचा उपयोग काय?' असा अकारण प्रश्न पडतो. यावर तुकडोजी म्हणतात - - "दिखाऊ कपडे, कोरडी ऐट। नोकरपेशी थाटमाट।। हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट। ध्यानी घ्यावे हे नीट ।।५।। बाप शेतकरी असतो आणि असा शिकलेला मुलगा नोकरीची वाट पाहतो. जुजबी काम करून खूप पैसा कमावणारा 'बाबूसाहेब' व्हायला पाहतो; पण हे तुकडोजींना देशहिताचे, ग्रामहिताचे वाटत नाही. गावीही राहायला भूषण वाटेल असे शिक्षण पाहिजे. कष्टाळू भारताचे सुपुत्र म्हणून सुशिक्षित तरुण त्यांना अपेक्षित आहेत. त्यांचे म्हणणे असे होते की, शिक्षणातील जीवनाचे काम, दोन्हींची सांगड, उत्तम असली पाहिजे। आयुष्य जगताना शिक्षण उपयुक्त हवे. जीवनाच्या गरजा संपूर्ण। निर्वाहाचे एकेक साधन।। संबंधित विषयांचे समग्रज्ञान। यांचा अंतर्भाव शिक्षणी।। (४४)