पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकडोजींचे शिक्षण चिंतन : संत तुकडोजींनी ग्रामगीतेतील एकोणिसावा अध्याय हा जीवन शिक्षण विचाराला वाहिलेला आहे. स्वत: अत्यल्प शिक्षित असूनही इतका मूलगामी आणि मूलभूत शिक्षण विचार त्यांनी केला, याचे आश्चर्य वाटते. अनुभवसंपन्न माणसाचे चिंतन किती प्रगल्भ आणि परिपक्व असू शकते याची प्रचीती आपल्याला येते. संत तुकडोजींना सतत ग्रामसुधारणेची चिंता लागलेली असल्याने त्यांना गावाच्या उपयोगी पडणारे सुशिक्षित नवयुवक घडवावेत असे वाटते. म्हणून ते म्हणतात. आदर्श होतील विद्यार्थीगण। गावाचे पालटेल जीवन। कोठेच न उरेल गावंढळपण। टिकाऊ परिवर्तन यामागे।। विद्यामोले ऐसे चढता। येईल भाग्य गावाचे हाता। तुकड्यादास म्हणे तत्त्वता। विसरू नका हा मूलमंत्र।। इतिश्री ग्रामगीता ग्रंथ। गुरु शास्त्र स्वानुभव संमत। कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ। एकोणविसावा अध्याय संपूर्ण।। संत तकडोजींनी शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत व्यवहार्य, वास्तव, प्रत्यक्षाला धरून विचार केलेला आहे. म्हणून त्यांनी या अध्यायाला 'जीवन-शिक्षण' असेच नाव दिले आहे. त्यांना नुसते शिक्षण अभिप्रेत नाही. तर जीवनाभिमुख प्रत्यक्षात उपयुक्त ठरणारे शिक्षण अपेक्षित आहे. दैनंदिन जीवन जगताना या शिक्षणाचा उपयोग व्हावा. त्याचे चिंतन अनेक परीने त्यांनी केले आहे. आजही त्यांचे हे शिक्षणविषयक विचार (४३)