पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

' - -'- . --.. . । माणसाजवळ विवेक आला की सर्व त-हेच्या भजनातून सार काढता येते. मग ती भजने, भक्ती ज्ञान, वैराग्य कोणत्याही विषयावरील का असेना, त्या सगळ्यांच्या मधून राष्ट्रीयतेची सहज भावना अभिव्यक्त होते. राष्ट्रीयतेचा स्वर मध्यवर्ती म्हणून आळविला जातो. यातूनच पुढे आत्म्याची आणि मानवतेची विशालता आपल्याला जाणवू लागते. आजच्या युगात विवेकासंबंधी आदर असणे आवश्यभावी आहे. या विवेकातूनच आत्म्याची व्यापक अनुभूती निर्माण होत असते. अशाप्रकारे थोर संतश्रेष्ठांचा विवेक याच माध्यमातून प्रगत होत असल्याने तो सर्वस्पर्शी, परिणामकारक उपकारक ठरतो. श्रीगुरू ज्ञानेश्वरादि संतश्रेष्ठांचा विवेकावरील आदर हा याच कोटीतला आहे. ज्ञानेश्वरमाऊली म्हणते. मम हृदयी सद्गुरू। जेणे तारिली हा संसारपुरू। म्हणोनि विशेष अत्यादरू। विवेकापरी। (ज्ञानेश्वरी, अ.१ ओवी २२) मानवतेची पूर्णता सर्वव्यापी विवेक अनुभवूनच येते. अशाप्रकारे मानवी जीवनाचे शाश्वत व अंतीम मूल्य शोधून काढणाऱ्या या विवेकाची माधुरी काही औरच असते. या भूमिकेवरूनच विवेक माधुरीची रुचि घेणे आवश्यक आहे. असे आपल्या भूमिकेत संत तुकडोजी महाराजांनी प्रतिपादन केले आहे. अन्न-वस्त्र दे विद्या बल दे। घरोघरी सुविचार शील दे।। तुकड्यादासा दे पदि ठावा। मंगलकर मंगल देवा।। (४२)