पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'""-" "---- - ईश्वरविषयक आत्यंतिक तळमळ होय. मग ती कोणत्याही वाद्यांच्या सहाय्याने वा कशाही रुपात प्रगट होवो. म्हणूनच नदीच्या तीरावर दोन गोटे वाजवूनही एखाद्या भक्ताने केलेले भजन देवाला मानवते. उपासकांना उद्देशून राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात, 'तुम्ही जर शब्दांकडे अर्थाच्या दृष्टीने व मनाच्या निर्मळ भावनेने पाहू लागलात. तरच तुमच्याकडून भजन होईल व आत्मोन्नतीही साधेल. आणि नंतर अध्यात्ममार्गाचा अनुभव कळू शकेल.' भजन म्हणजे दैवी शक्तीच्या बगीच्यात नेऊन त्यावर भक्तिरूपी सुगंधाचे आवरण घालणे होय. 'तुकड्या दास म्हणें गुरुदेवा। भक्तिरमो अमुच्या जिवभावा। वीर सदा विजयी हो।। सुखाचा मार्ग जगाला पावो। निर्मळ ज्ञान प्रवाहो।। त्याचप्रमाणे, सेवाधर्म जिवाचा वाढो। अविचल प्रेम न भू चे खंडो।। ऐक्यपणे प्रभु गावो। सुखाचा मार्ग जगाला पावो।। हीच संत तुकडोजी या राष्ट्रसंताची मनोभावना आहे. संत तुकडोजी महाराजांची 'विवेक माधुरी' ही भजनावली विवेक मंथन सादर करणारी आहे. 'विवेक' हे ज्ञानप्राप्तीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आकलन होत नाही; कळत नाही. ते म्हणतात, "धगधगते ज्वाला त्यागाची। उज्ज्वल ज्योती निज ज्ञानाची।। हाती कमळे जनसेवेची। नित्य शिकविते विचार मंथन।।" तो . -- - - - - - - - (४१) BLRUARAN