पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनार्दन व्यापला' “कर्तव्य ही पूजा प्रभूची" “विश्व हे घर अपुले' असा प्रत्यय येतो. "विश्वचि घर भासूनि, जीव हा होत सदा दंग। प्रगटतो भक्तीचा रंग। असा हा संतांचा संग।। 'सुखाचा मार्ग जगाला पावो' : साधकाच्या मनात भक्तीची ज्योत, माणसाच्या मनातील भावभावनांना ईश्वरीशक्तीचा वरदहस्त लाभावा, त्या दैवीशक्तीचे मार्गदर्शन लाभावे म्हणून सतत तेवत ठेवली पाहिजे. युगायुगानुसार साधुसंतांनी धर्ममार्ग भाविकांच्यासाठी आखून दिलेले असतात. त्याला मात्र भाविकांची श्रद्धा, प्रेम आणि आचरणाची जोड असली पाहिजे. अन्यथा ईश्वराच्या विशुद्ध भूमिकेचे ज्ञान होणार नाही. 'अनुभव सागर' या भजनावलीत संत तुकडोजी महाराजांचा हा संदेश आहे. शब्दांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले होते. शब्दच दुर्बळाला बलवान आणि अडाण्याला ज्ञानी बनवतात. पण त्यासाठी निर्मळ मन आणि अनुभूतीची जोड शब्दांना असावी. 'अजित नाम वदो भलत्या मिसे। सकल पातक भस्म करितसे।। उपासकांनी हे जाणून आचरण केल्यास वाणीत तेज आणि आत्मबल प्राप्त होईल. ईश्वराच्या आणि भक्ताच्या उत्कट प्रेमभक्तीच्या खुणा असतात. तुम्हाला त्या जाणून घ्याव्या लागतील. तुकडोजी म्हणतात, 'भजन म्हणजे मनाची (४०)