पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरुणास, विद्वानास अशा सर्वांना स्वधर्माची जाणीव करून दिली आहे. क्रांतीचा अर्थ रक्तपात नसून त्याग, सेवा, सत्य, प्रेम, अहिंसा आहे. ही क्रांतीची शाश्वत मूल्ये त्यांनी मानली आहेत. क्रांतीची ही एक जागती मशाल बनली आहे. क्रांती ही विध्वंसासाठी नाही, तर शांती प्राप्त व्हावी म्हणून करायवाची असते. परिवर्तन म्हणजेच क्रांती. समाजाच्या अध:पतनाची कारणे नष्ट करणे, समाजव्यवस्थेत उत्कर्ष व सुखशांतीसाठी परिवर्तन घडवून आणणे आणि आवश्यक गोष्टींचे नवनिर्माण गरजेसाठी करणे यात क्रांती आशय आहे. तुकडोजी संदेश देतात, 'आमची क्रांती ही वीणा बनली पाहिजे. खंजीर किंवा बॉम्ब नव्हे.' वीणा आपल्या झंकाराने विषारी सर्पालाही वश करू शकते. वीणेच्या प्रभावी स्वरांनी अंधारात दीप उजळतो. अंत:करणातल्या परमेश्वराला जागवून स्वर्गात जगाला 'वीणा' बदलवू शकते. अशा या प्रत्येक भजनातील वीणेचा झंकार । निनादत आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात. 'नव-क्रांतीची वीणा मंजूळ वाजे रे, 'तुकड्यादास गमे युगधर्मचि हा साजे रे' आम्ही क्रांतीचे वीर गडी रे। सरळ करूं बिघडली घडी।।धृ।। आमुची क्रांती शांति शिकविते, प्रतीक त्याचे वीणा चिपळी।। दृष्टीत दिव्यता आली की, त्या दिव्यदृष्टीने ईश्वराचे विश्वदर्शन होते. विश्वाच्या विशालतेत जीवाचे विलीनीकरण झाल्यानेच मग “सर्वभूतमात्र मीच" असा अनुभव येतो. जगती (३९)