पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आर्तता, अनुताप, दर्शनोत्कंठा, हटयोग, राजयोग, विहंगममार्ग, अजपा, अनाहतध्वनी, मुद्रा, चक्रभेदन, तत्त्वमसि, महावाक्य ॐ तत्सत् इत्यादी वर्णने आणि अधिकारवाणीचा रोकडा उपदेश हे सारे काही स्तिमित करणारे अवतरलेले आहे. विविध पंथोपपंथ, धर्म आणि देवदेवता यातील समसमान भाव, आत्यंतिक गुरुनिष्ठा, देवदेवतांमध्येही सद्गुरुचे होणारे दर्शन, हेही विषय या भजनावलीत आलेले आहेत. "झटकन् उठूनी पटकन लागे सहजसमाधी हो। आनंदे डुलतसे, खावया मिळती मोती हो" या अनुभूतीची प्रचीती त्यांना आलेली आढळते. 'आडकुजी - चरणांनी गेले कितितरि पुढेहि जातील। धर्मकलियुगी हाची, तरेल भवि जो धुळीच लावील।। आपल्या संदेशात तुकडोजींनी नेहमीच कमालीची नम्रता, विनयशीलता, अमानित्व धारण केले आहे. ते म्हणतात, 'आमचा बालपणचा वेडेपणा, ती अध्यात्मिक धारेतली मस्ती, चुकल्या माकल्या शब्दांत आपणासमोर येत आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित या भजनांमधून प्रभावीपणे मानवी जीवनाला सर्वांगीण मार्गदर्शन लाभले आहे. लोकांनी ही लोकभजने गाताना, त्याच्या अर्थबोधाशी समरस व्हावे. ही महाराजांची अपेक्षा आहे. लोकांना ते म्हणतात, “वाचा, आचरा. देशाचा उद्धार करा आणि आत्मवान बना." तर 'क्रांतिवीणा' मधून तुकडोजी महाराजांनी देशभक्तास, . देवभक्तास, अबला महिलेस, श्रीमंत धनिकास, व्यसनी (३८)