पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराजांनी अचूकपणे ग्रामावरच आपले लक्ष केंद्रित करून सर्व काही देण्यासाठी, सर्वस्व अर्पण करण्यासाठी, सेवेसाठी ही 'ग्रामगीता' साकार केली. लोकजागृतीचा अरुणोदय : - - - - - 'उठा गड्या। अरुणोदय झाला श्रीसद्गुरुच्या ज्ञानाचा। सोडा काम विकार बिछाना, नाश करा अज्ञानाचा।।' बाल्यावस्थेच्या कालातील वंदनीय संत तुकडोजी महाराजांची ही रचना आहे. ही रचना साधीसुधी बाळबोध वाटली तरी भावी कालखंडातील ज्या रचना झाल्या त्या म्हणजेच लोकजागृतीचा अरुणोदय होय. त्यांची भजने खंजिरीवर गाजायची आणि भक्तजन भक्तिभावाने, ती लिहून ठेवायची त्यातून भजनावली पुस्तिका संग्रहित झाल्या आहेत. लेखनिकांविषयी कृतज्ञता महाराजांनी - 'ऐदीनारायण आमुचा स्वभाव। परी बापूराव पाळी आम्हां।' या शब्दांत गमतीदारपणाने व्यक्त केली आहे. बापूराव पाटील त्यांचे लेखनकर्ते होते. बालमित्र होते. त्यांच्या भजनांच्या वहीत स्वत: तुकडोजी महाराजांचे हस्ताक्षर, आढळते. तरुण वयातील त्यांच्या या रचना असल्याने काही ठिकाणी 'माणिक म्हणे' असे उल्लेखही आलेले आहेत. 'मायबाप रागावती' असेही त्यात म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे 'वय हे गेले सतराचे, झाले तुकडे धैर्याचे' असा वय वर्ष १७ असल्याचा निर्वाळा आलेला आहे. याही वयात या राष्ट्रसंतांच्या काव्यात (३७)