पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-.


- -:-.- - --.' -"



-



--- --- - - --- -- --


---


-


--"-- "-"---- -


- - सूरदास-महाराज, योगीराज श्री अरविंदबाबू, श्रीसमर्थ अडकोजी। महाराज, पूज्य महात्मा गांधी, श्रीमत् स्वामी विवेकानंद, श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत नामदेव महाराज या सर्वच संतांचे उल्लेख, प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे संत तुकडोजींच्या ग्रामगीतेत आले आहेत. याचा अर्थ त्यांनी या सर्व साधू संत महात्म्यांच्या चरित्राचे अवगाहन केले होते. चिंतन केले होते. म्हणूनच त्यांचे उल्लेख तर आलेच पण तुकडोजींच्या व्यक्तिमत्वात प्रगल्भता, अनुभव संपन्नता अवतरलेली दिसते. समृद्ध अनुभवाची परिपक्व अभिव्यक्ती ही त्यांची 'ग्रामगीता' या महामानवांच्या विषयीच्या श्रद्धेने बनली. 'संत महात्म्यांचे हृदगत। देवाचा शुभ सृष्टी संकेत।। विशद कराया सरळ भाषेत। सुखसंवाद आरंभिला।। स्त्रिया, मुलेही होतील आदर्श। पूर्ण हा ग्रंथ घरी होता पठण।। ग्राम होईल वैकुंठ भुवन। वाचता वर्तता ग्रामगीता।। स्वत: संत तुकडोजी महाराजांनीच हे नमूद केलेले आहे. या ग्रंथाच्या अंमलबजावणीने नक्कीच खेडी उजळतील. या प्रासादिक वाणीने बहुजन समाजाचा उत्कर्ष घडून येईल. असंख्य जणांवर याचा प्रभाव अवश्य पडेल. त्यांच्या प्रेरणेने जागोजाग गुरुदेव सेवा आश्रम उभारले. 'मोझरी' येथील, त्याचप्रमाणे विदर्भ, नागपूर भागातील या आश्रमांत सर्व साधूसंतांच्या प्रतिमा विराजमान झालेल्या दिसतात. याचे कारण त्यांच्याविषयी संत तुकडोजींची अपार भक्ती. भावना हेच होय. आज अत्यंत दुर्लक्षित दुःखी जीवन म्हणजे खेड्यातील जीवन. त्या दुःखाचा परिहार कसा होईल ही आपली समस्या म्हणूनच तुकडोजी (३६) --- - -.- .