पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'आमची संपत्ती नसे आमची। आमची संतती नसे आमची।। कर्तव्य शक्तीही नसे आमची। व्यक्तिश: उपभोगार्थ।। ।। हे सारे गावाचे धन। असो काया वाचा बुद्धी प्राण। ऐसे असे जयाचे धोरण। तो नास्तिकही प्रिय आम्हां। तो तत्त्वत: नास्तिकचि नोहे। जो सर्वांशी सुखविताहे। तो देवदेव जरी न गाये। तरी देव सेवाचित्तया घडे।। देव म्हणजे घेवचि नोहे: 'देव म्हणजे देवचि आहे.' देव, ईश्वर म्हणजे काहीही न घेणारा आहे. देव याचा अर्थ 'देव', 'द्यावे' असाच. संत तुकडोजी 'देव' शब्दावर कोटी करून अर्थ लावतात. समाजाला द्या, गावाला द्या, हेच देणे त्यांना अभिप्रेत आहे. ते स्वत:ला तुकड्यादास म्हणवितात. समर्थ रामदास ही स्वत:ला 'दास'च म्हणवित असत. अचेतन समाजाला 'दासबोध' लिहून समर्थ रामदासांनी जागविले तद्वतच राष्ट्रसंतच म्हणविल्या जाणाऱ्या संत तुकड्यादास यांनीही त्याच धाटणीची आणि त्याच धरतीवर आपली 'ग्रामगीता' लिहिली. त्यांनी खेडेगावात आणि त्या निमित्ताने शहरातही जागृती केली. त्यांना सर्वच संतांबद्दल कमालीचा आदरभाव आहे. तो त्यांनी ग्रामगीतेतून आणि आपल्या भजनावलीतूनही जागोजाग प्रगट केला आहे. ' एवढेच नव्हे तर त्यांच्या ग्रामगीतेत - 'साधुसंत देवधर्म। मानवोद्धारचि त्यांचे कर्म। तेचि आठवूनि उद्धरु ग्राम। तुकड्या म्हणे। (३४)