पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फलाची अपेक्षा न ठेवता निष्कामपणाने, निरपेक्ष, निस्पृह भावनेने कर्म हीच केवढी - जनसामान्यांची सेवा होय. "खरी सेवा निष्काम धर्म। परस्परांच्या सखाचे वर्म। समजोनि करील जो त्याग उद्यम। तोचि सेवाभाव समजावा।" राष्ट्रसंत म्हणतात : “सर्व मिळोनि एकत्र राहावे। सर्वांनी सर्वांस चालवावे।। सर्व भूतहित रत व्हावे। ऐसे वचन गीतेचे।। (३८-२०) हीच व्यापक सामाजिक समरसतेची भावना संत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्षात समाजात रुजविली. ग्रामजीवनाचे पुनर्घटन : राष्ट्रसंत तुकडोजींच्या 'ग्रामगीता' या पांडुरंगाच्या प्रेरणेने, मोठ्या आत्मविश्वासाने 'पंढरी' येथे लिहिलेल्या काव्यमय ओवीबद्ध ग्रंथात ग्रामजीवनाच्या पुनर्घटनाचा विचार अत्यंत सखोल स्वरूपात केलेला आहे. अगदी बारिकसारिक बाबतीतही ध्येयवादाच्या दिशेने आणि आशावादी भूमिकेतून ग्रामोन्नतीचा विषय या ग्रामगीतेत मांडला आहे. समाजसुधारक या नात्याने महाराजांना जे सूचवावासे वाटले ते त्यांनी विनासंकोच, (३१)