पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरसतेसाठी असते. ज्यांचे जीवन विश्वाशी समरस झाले आहे. त्यांच्याच शब्दांत एवढे अचाट सामर्थ्य असू शकते. तेच सामर्थ्य राष्ट्रसंत तुकडोजींच्या शब्दांत आहे. ग्रामगीतेत आहे. महाराजांनी खेडेगावातील जीवनाचा गाभाच आत्मसात केला आहे. ग्रामीण समाजातील चांगल्या वाईट गोष्टी, त्यांची बलस्थाने, त्यांचा दुबळेपणा या सगळ्यांचा अनुभव घेऊन वात्सल्यपूर्ण वाणीने त्यांना समाजातील सर्व भेदाभेद विसरून जीवन यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. लोकांचे जीवन विशुद्ध करण्याची तळमळ त्यांच्या उपदेशात आहे. त्यांच्या शिकवणुकीत स्पष्टपणा आहे. हाशि 'खरे नाम, निष्काम ही ग्रामसेवा। - झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा।। लामा । कळो हे वळो, देह कार्थी पडू दे। 5 घडू दे प्रभो। एवढे घडू दे।।' 'समाजाच्या उन्नतीचे सूत्र। खंडू न द्यावे सर्वत्र' हेच महाराजांचे सांगणे आहे. ग्रामसेवा म्हणजे विश्वात्म्यांची सेवा, कारण गाव हा विश्वाचा लहान भाग आहे. महाराज स्पष्ट शब्दात सांगतात की - ग्रामगीता नव्हे पारायणासि। वाचता वाट दावी जनांसि। समूळ बदलची जीवनासी। मनी घेता अर्थ तिचा।।' मग संकल्पावे कार्याचे साधन। ग्राम स्वर्ग करावया।। सर्व भूत प्राणी मनुष्यामात्राचे हित, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सगळ्यांच्या कल्याणाकरता अनासक्त भावनेने कोणत्याही (३०)