पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देणारा आशय आहे. त्यात सामाजिक समरसता ओतप्रोत भरलेली आहे. म्हणूनच आज खेड्यापाड्यातील बहुजन समाजापर्यंत त्यांची सामाजिक समरसतेची ही हाक पोहोचलेली आहे. हजारो लोकांना आता राष्ट्रसंत तुकडोजींनी या दिशेने कार्यप्रवृत्त केले आहे. ज्याला त्यांचा जीवनग्रंथ म्हणता येईल अशा ग्रामगीतेत सर्वत्र जातिभेद, विषमता, भेदाभेद याचे खंडण महाराजांनी केले आहे. लोकसमाजाचे दोषाविष्करणही निर्भिडपणे केलेले आहे. तुकडोजींनी आधी केले मग सांगितले. त्यामुळे त्यांच्या वाणीला लेखणीला धार प्राप्त झाली. वजन आले आहे. अनुभवातूनच ते येऊ शकते. ग्रामसफाई, सूतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना इत्यादी अनेक गोष्टींच्या द्वारा त्यांनी ठिकठिकाणी ग्रामांना समाजसेवेचे आणि समरसतेचे वळण लावले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची सलग दोन तपे खर्ची घातली आहेत. जपानमध्ये भरलेल्या धर्मपरिषदेतही त्यांनी मानवधर्माची ध्वजा फडकाविली आहे. या ग्रामगीते प्रमाणेच सेनापती बापटांनीही गरजेपोटी 'गावगीता' लिहिलेली आहे. कारण त्यांना 'ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर' ही बाब पुरतेपणी पटली होती. सगळ्यांना आपली बोली समजावी हा आग्रहही या ग्रामसुधारणा शिकविणाऱ्या गीतेत आहे. जी व्यक्ती जनसागराचे हृदय आंदोलित करू शकते. तीच देशात अचाट क्रांती घडवून आणू शकते. लोकांचे मतपरिवर्तन आणि मानसिक सुधारणा करण्याची आवश्यकता सामाजिक (२९)