पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधुत्वशक्तीला येथे साहित्य शक्तीची आणि नवीन युगातील नव्या विचारांची जोड लाभली आहे. आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती याचे सर्व सामर्थ्य एकवटून त्यांनी सामाजिक जागृतीचे आणि समाजाच्या प्रगतीचे प्रयत्न परोपरीने केलेले दिसतात. मरगळलेल्या ग्रामीण जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या ग्रामगीतेने केले आहे. 'उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।' 'सर्वचि कामे मूल्यवान आहेत.' त्यात महिला उन्नतीच्या कार्याला विशेष प्राधान्य आहे. नागपणाम हिना समाज समरस राष्ट्रसंत : 'गावागावासी जागवा। का भेदभाव हा समूळ मिटवा। 15 उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।। हा संदेश सोप्या भाषेत समस्त जनता जनार्दनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिलेला आहे. माणसांना माणूस बनविण्याचा प्रारंभिक प्रयत्न या भगवद्गीतेने केला आहे. कमालीच्या तळमळीतून त्यांनी ग्रामगीता लिहिली आहे. अंत:करणाच्या पीळातूनच असे साहित्य निर्माण होते. या साहित्याने समाजजीवन ढवळून काढले आहे. सर्वसामान्य भिक्षेकऱ्यांच्याही तोंडी तुकड्यादास म्हणे ही भजने सर्वत्र ऐकायला मिळतात, याचे कारण त्यातील मानवतेचा संदेश (२८)