पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकडोजी महाराज आणि महिलोन्नती : महिलोन्नती हाही संत तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू आहे. कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनांच्याद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे हे कसे अन्यायकारक आहे हे तुकडोजींनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या ग्रामगीतातून, भजनावलीतून पटवून दिले आहे. दृष्टी परिवर्तन पंचकात महिलोन्नती हे त्यांचे स्वतंत्र अध्याय/प्रकरणच आहे. त्यात त्यांनी 'मातृ-गौरव' ग्रंथातील स्त्रीच्या निषेधाचे कारण आणि मौलिक स्त्री वैशिष्ट्य, स्त्रीयांच्या अनावस्थेत राष्ट्राची दुर्गती आणि स्त्रीसामर्थ्य, समाजाचा महिलांवर अन्याय, स्त्री शिक्षणाची यथार्थ दृष्टी आणि महिला संघटन इत्यादी विषय आलेले आहेत. त्यात त्यांनी प्रारंभीच नमूद केले आहे. 'ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण। उद्याचे राष्ट्र आजचे संतान। यासाठी आदर्श पाहिजे गुरुजन। राष्ट्र निर्माते।।१।। विद्यागुरुहूनही थोर। आदर्श मातेचे उपकार। गर्भापासोनि तिचे संस्कार। बालकांवरि।।२।। जिच्या हाती पाळण्याची दोरी। तीच जगाते उद्धरी। ऐसी वर्णिली मातेची थोरी। शेकडो गुरुहूनही।।३।। आईच्या स्वभावातूनच पुत्राची घडण होते, मुलांचे वर्णन तेजस्वी आणि उज्ज्वल ठेवते ती आईच. पुरुषांचे मोठेपण सुद्धा स्त्रीच्या तेजावरच अवलंबून असते. मुलांच्या चारित्र्याचे (२६) 22