पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐशा भोळ्या शंकरासि। सौख्य लाभावे सर्व देशी।क मानवाची पूर्णता तुजसी। प्राप्त व्हावी, मना वाटे।। म्हणौनि केली ग्रामगीता। जागत व्हाया ग्रामदेवता। तुकडोजींचे हेच शेतकऱ्यांबद्दलचे मागणे आहे की, 'तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो। सकळांचे लक्ष तुजकडे वळो।।' मानवतेचे तेज झळझळो। विश्वामाजी या योगे।। त्यांची ही 'ग्रामगीता', 'केवळ नाही पारायणासी' असे तुकडोजींनी कठोरपणाने सांगितले आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदबुवांपासून दर नेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरे ओढले. ग्रामगीता ही या राष्ट्रसंताच्या समग्र तत्त्वज्ञानाचे साररूप आहे. ग्रामविकास कार्याला गती देणारी ही ग्रामगीता अनन्यसाधारण, अद्वितीय आहे. संत तुकडोजींनीच संदेश दिला आहे की, “आपल्या लोकांचं कर्तव्य हेच असू शकते की ह्या वाङ्मयाला करोडो मुखी व कानी जाऊ द्यावे....' त्यांची ही ग्रामगीता जनजागृतीसाठी गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. 'घरोघरी चालवाया प्रचार निर्मळ। ग्रामगीता वाचनाचा।।........ (२५)