पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरतेपणी कल्पना होती. तेथील परिस्थिती आणि वातावरण त्यांनी स्वत: भोगलेले होते. लहानपणी सोसाट्याच्या वादळाने त्याच्या घरावरच छप्पर उडाले आणि नंतर फक्त आकाशाचाच छप्पर त्यांना आयुष्यभर पुरले. त्यामुळे तुकडोजींनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत आणि अत्यंत मूलगामी विचार केला. या सर्व समस्यांचे स्वरूप जाणून घेतल्यामुळे त्या कशा सोडवाव्यात हेही त्यांनी त्यावरील उपाय योजनांसह मांडले आहे. त्यांच्या या चिंतनात द्रष्टेपणा आहे. तत्काल संदर्भात तर त्यांच्या उपाययोजना उपयुक्त ठरल्याच पण आजही त्या ग्रामीण विकसनकार्यात अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. त्याच मार्गाने आज ग्रामविकास साधण्याचा प्रयत्न आहे. 'ग्रामगीता' या रचनेत तुकडोजी महाराज म्हणतात - 'संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्नस्थिती।। -साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धांत मती सारखी।।' ऐहिक आणि पारलौकिक यांचा सुंदर समन्वय या राष्ट्रसंताच्या ग्रामगीता, काव्यात झालेला आहे. गावागावातील ही सर्व जनता निरोगी, धष्टपुष्ट आणि सुखी व्हावी, ऋग्वेदातील या महामंत्राप्रमाणेच संत तुकडोजींनी आचरणात आणण्यासाठी ग्रामगीता लिहिली. आपल्या अर्पणपत्रिकेत दि. २६ ऑगस्ट, १९५५ सालीच त्यांनी ग्रामगीतेत लिहिले आहे.. 'सर्व ग्रामासि सुखी करावे। अन्नवस्त्र पात्रादि द्यावे। परि स्वत: दःखचि भोगावे। भूषण तुझे ग्रामनाथा।। कष्ट करोनि महाल बांधसी। परि झोपडीही नाही नेटकीसी। स्वातंत्र्याकरिता उडी घेसी। मजा भोगती इतरचि।। (२४)