पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विसोबा खेचर पहडले होते, तेव्हा संत नामदेव रागावले व देवावर काय पाय ठेवता म्हणाले. तेव्हा विसोबांनी सांगितले तू उचलून दुसरीकडं ठेव ना. तेव्हा त्या नामदेवाला देव नाही, शिवलिंग नाही अशी जागा गवसली नाही. त्याला मग ईश्वर चराचरात सर्वत्र भरलेला आहे हा साक्षात्कार झाला. हीच गोष्ट भक्त प्रल्हादाच्या बाबतीतही घडली. हिरण्यकश्यपू याने त्याला चवताळून विचारले होते, 'तू म्हणतोस देव सगळीकडे आहे, मग सांग या खांबात आहे का?' असे म्हणून त्याने खांबाला जोरात लाथ मारली आणि त्यातून नरसिंह अवतार, प्रगट झाला. असा हा देवाचा सर्वत्र वास असतो. पण हा देव तुकडोजी म्हणतात त्याप्रमाणे फक्त भावाचाच भुकेला असतो. जिथे खरा भक्तिभाव तिथे तो प्रगट होतो. मग मंदिराचे द्वार फिरते, देव हट्टाने नैवेद्यही खाऊ शकतो. मात्र त्यासाठी तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे मी-तू पणाचा भाव मेला पाहिजे, संपला पाहिजे. अद्वैतभाव प्रस्थापित व्हावा. 'देवाचं देवत्व आहे ठाई ठाई नया मी तू मेल्याविण अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे।' मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे असा हा 'हरि आठवा आपुल्या मनी भाव धरोनी' हे त्यांचे सांगणे होते. (२०)