पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाजाराचा भाजीपाला नाही. भाजीपाल्याचे मोल कमी असते आणि तो लगेच शिळा होतो. तसे देवाचे नसते. जर तुमच्या अंत:करणात परमेश्वराबद्दल भक्तिभाव नसेल आणि तुम्ही कितीही विनवणी केली, मनात इच्छा धरली देवाला पाव म्हटले, प्रसन्न हो म्हटले तरी देव प्रसन्न होणार नाही. देवाचे मोल भावात आहे ते समजून घ्यावे. आपले देव कशाकशाचे असतात पण त्याला नश्वरता आहेच. संत तुकडोजी म्हणतात हा दगडाचा देव त्याला वज्र पहाराची भीती असते. मूर्तिभंजन होऊ शकते, मातीचा देव घडवलेला असला तर तो पाण्यात विरघळून जाऊ शकतो. लाकडाचे काही देव, मूर्ती तयार केलेल्या असतात त्यांनाही अग्नीची भीती असते. ते पेट घेऊ शकतात. जळून जाऊ शकतात. सोन्याचांदीच्या बनवलेल्या देवाच्या प्रतिमांना तर कायम चोराची भीती असते. तेव्हा या सगळ्यातच, दगड, लाकूड, माती, सोने, चांदी यात खरा देव सामावलेला नाही. तो राहतो तुमच्या आमच्या हृदयात. भक्तिभावात आहे, ना दगडात, ना लाकडात, ना सोन्या-चांदीत देव राहतो. तो राहतो साधूसंतांनी आपल्या सुमधुर भावभक्तीपूर्ण वाणीने सांगितले आहे, अगदी परोपरीने सांगितलंय की मनात भाव बाळगा देव तिथेच असतो. त्यासाठी आचरणाची गरज आहे. नुसत्या शब्दांच्या बुडबुड्यांनी काही साध्य होत नाही. मनाला शांती खरी लाभत नाही. देवाचे देवत्व सर्वांठायी आहे. देव सर्वत्र आहेच आहे. देव नाही असे स्थान शोधूनही नामदेवाला सापडले नाही. असे म्हणतात शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून (१९)