पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'हा जीवाचा भाव ऐका' असा कळकळीचा संदेश संत तुकडोजी महाराजांनी दिला आहे. 'ब्रह्मानंदी टाळी लागली। आता उरला गोविंद।। अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. गहिवरल्या कंठातून वाहत्या नयनधारातून संत तुकडोजी महाराज म्हणतात, 'गोविंद म्हणा गोविंद। 'अवघेची धरा हा छंद'।। गाताहेत भजनसंत - अनुभवची संत स्वच्छंद। तुझ्या स्वरुपी सदा आनंद।।" संत ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणेच 'हे विश्वचि माझे घर' ही संत तुकडोजींची संकल्पना आहे. ते म्हणतात, - ‘विश्वचि घर भासुनी, जीव होतसे सदा दंग' भक्तीचा खरा रंग प्रगटवणारा हा सत्संग आहे. भक्त ईशसेवेत इतके दंग होतात की ते ब्रह्मच त्यांचे अंगांग होऊन जाते. सगळा अहंकार गळून पडतो लोभ नाहिसा होतो. या प्रेमाची भांग एकदा चढली की मरणाचे दुःखही नाहिसे होते, सौख्याचे राज्य प्राप्त होते. 'विश्वची घर भासूनी। जीव हा होत सदा संग। प्रगट तो भक्तीचा रंग। असा हा संतांचा संग।। भाव तेथे देव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नव्या पुरोगामी विचाराला प्राधान्य देतात. त्यांचा पुरस्कार करतात हे त्यांच्या विविध पदातून आपल्या लक्षात येते. त्यांनी म्हटले आहे की देव हा काही (१८)