पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्यात्म चिंतन : छाया 'खोप माझी मोड की जर्जर। काय करू पाहुणचार।।' - असे तुकोबारायांनीही अभंगात लिहून ठेवले आहे. हीच स्थिती तुकडोजींची आहे. निष्णा संसाराचा बोझ वाहता। टेकलासे मरणाला।। नेसी साथी कुणाला। बोल बोल साथी नेशी कुणाला।। के ‘मान नाही अन् किर्ती न काही। उगाच फिरतो हेला। अशी माणसाची स्थिती होऊन बसते. आपल्याकडे एक म्हण आहे 'जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला' या म्हणी प्रमाणेच संत तुकडोजी महाराजांनी चालता चालता सरणाच्या वाटेवर पोहचत असल्याची चाहूल या अंतर्मुख करणाऱ्या चिंतनात व्यक्त केली आहे. संसाराचा हा बोजा म्हणजे ओझे वाहनच मरणकाळाजवळ आपण येऊन ठेपतो. आपण वैभवाचा उपभोग घेतला, संपत्तीचा विनाश केला. इतरांचे शोषण केले, कोणालाही सुख दिले नाही. सत्संग केला नाही. माणसे जोडली नाही, माणुसकीचा धर्म जोपासला नाही. दानधर्म केला नाही, तीर्थयात्रा, व्रत आचरण केले नाही. विषयांमध्ये एवढे गढून गेलो पण अजूनही मोह सुटता सुटत नाही. आता अखेरी प्रभू चिंतनाला स्मरणाला तू पारखाच झालास, पण निदान आता तरी तू शुद्धीवर येऊन नीट आपल्या सरत्या आयुष्याचे भान ठेवून 'भज भज रे गोपाळा', नाहीतर तुझी ‘पुनरपी जन्मम् पुनरपि मरणम्' या फेऱ्यातून सुटका होणार नाही. माणसाने योग्य वेळी प्रपंच (१४)