पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विषयातून अलिप्त होऊन अध्यात्म चिंतनात गढून गेले पाहिजे, अन्यथा पशुतुल्य ‘आहार, निद्रा, भय, मैथून,' हेच जीवन आपल्या वाट्याला येते म्हणून संत तुकडोजी महाराजांचे हे निर्वाणीचे कळकळीचे बोल आहेत. या भारतात बंधुभाव : या भारतात बंधुभाव या गीतामध्ये असे संत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की, या भारतात बंधुभाव। नित्य असू दे। दे वरची असा दे।। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे।। | राष्ट्रीय विचारसरणीने भारलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. भारतात बंधुभाव नांदावा असे त्यांना मनापासून वाटत होते. सगळे पंथ संप्रदाय यांचे ऐक्य घडवून यावे, एकत्रिकरण व्हावे, त्यांच्यात समन्वय घडून यासा अशी त्यांना तीव्र जाणीव होती. आपापसात परस्परांत कोणत्याही प्रकारचे मतभेद | शिल्लक राहू देऊ नको असे ते देवाजवळ मागणे मागतात. धर्मभेद नको, तसाच श्रीमंत आणि गरीब असाही भेदभाव नसावा. अस्पृश्यता तर कोठेही असू नये. जातिभेदाला मूठमाती | द्यावी. सर्वांना मानवताधर्म म्हणजेच आपल्या भारतदेशाचा | राष्ट्रधर्म हाच आहे हे कळावे. आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी शीलवान, सदाचरणी व्हावे हीच या संतसेवक तुकडोजी महाराजांची प्रार्थना आहे. भारताच्या सेवेचा संदेश त्यांनी सगळ्यांना येथे दिला आहे. एवढेच नव्हे तर खल, दष्ट, (१५)