पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवन स्वप्नांची प्रतिबिंबे ह्या ग्रामस्थांच्या मनामनात उमटविली. त्यांचे मरगळलेले जीवन चैतन्यमय बनविले. आपला देश शिक्षण, आरोग्य, धनधान्य याबाबतीत समृद्ध व्हावा यासाठी संत तुकडोजींच्या तळमळत्या मनाने हा वसा घेतला हे या विचार मंथनातून जाणवते. ग्रामजीवनाची म्हणजे पर्यायाने देशाची उन्नती हे व्यापक सूत्र या विचारात अंतर्भूत आहे. ग्रामजीवन, कृषिप्रधानता हा आपल्या भारत देशाचा आत्मा आहे, त्यांच्या उत्थानातच भारताचा खरा विकास आहे ही मूलभूत जीवनदृष्टी तुकडोजींना लाभली होती. म्हणून त्यांचे विचार समाजाला डोळस बनवितात. सात्विक समाधान : राज्यास जी महाली। सौख्ये कधी मिळाली।। ती सर्व प्राप्त झाली। या झोपडीत माझ्या।। 2 महाले आणि तिजोऱ्या। त्यातूनी होती चोऱ्या।। दारास नाही दोऱ्या। या झोपडीत माझ्या।। महाली मऊ बिछाने। कंदील श्यामदाने।। आम्हा जमीन माने। या झोपडीत माझ्या।। । भूमीवरी पडावे। ताऱ्यांकडे पाहावे।। प्रभुनाम नित्य घ्यावे। या झोपडीत माझ्या।। तुकड्या म्हणे फकीरा। भक्तीचा तो भुकेला।। 'तुकड्याकडे बघावे। किती आनंदी आनंद।।' संत तुकडोजी महाराजांनी येथे समाधानी, आनंदी