पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशाचा आत्मा 'ग्रामजीवन' : नियम मानावयाचे प्रथम माहेर। आपुले गाव त्यातील घर यातुनी प्रगती करीत सुंदर। पुढे जावे विश्वाच्या।। गावची जरी उत्तम नसेल। तरी देशाचे भवितव्य ढासळे। ___ऐसे जाणावे जाणत्याने भले। हृदयामाजी।। ग्रामातील जन सर्वेश्वर। जाणावे ग्राम हेच मंदिर।। सेवा हेची पूजा समग्र। हाच विचार निवेदावा। ग्रामीण भागातील सामान्यजणांच्या मनी मानसी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जाऊन बसले म्हणून त्यांना हे चिंतन स्फुरले आहे. ग्रामीण जीवनातील अंधाराला मागे हटवून प्रकाशाची सोनेरी आश्वासक किरणे आणण्यासाठीच या संताने आपली सगळी हयात घालविली होती. असा हा त्यांचा ग्रामजीवन पुनर्घटनेचा, पुनर्रचनेचा सूत्रपाठ म्हणजे हे ग्राम चित्रण आहे. भू वैकुंठातील आदर्श खेड्यांचा भारत निर्माण व्हावा हीच तुकडोजी महाराजांची प्रबळ इच्छा आणि विचारधारा होती. संत तुकडोजींचे कार्य क्रांतिकारक विचारांनी प्रेरित होते. आपली वाणी आणि लेखणी, सारी शक्ती, भक्तीचे सगळे सामर्थ्य एकवटून त्यांनी ही समाजजागृती केली. झोपी गेलेल्या खेडूतांना, त्यांच्या खेड्यांना जागविले. त्यांच्या ठायी असलेले अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक जडत्व यामुळे त्यांच्या जीवनाला प्राप्त झालेली अवकळा नाहिशी केली, खेड्यातील अडाणी मनाचे आरसे स्वच्छ पुसले जावेत असे पाहिले. सुखी व सुधारलेल्या (११)