पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लागेल, एवढे या ग्रामगीतेचे भगवद्गीतेसारखेच महत्त्व आहे. सगळ्या कामांची योग्यता सारखीच आहे. स्वामी विवेकानंदांनीही 'कामे सर्वचि मूल्यवान। त्याची योग्यता समान' हेच सांगितले आहे. का। श्रीकृष्णे सिद्ध केले उच्छिष्टे काढून। नानाज ओढिली ढोरे विठ्ठले।" मंदिरी बसूनी नाक दाबावे।।' यापेक्षा संत तुकडोजी म्हणतात‘मार्गीचे काटे उचलावेत। दुःखिताशी पाणी पाजावे। हे धर्म श्रेष्ठ तीर्थस्नानाहुनी।।' अधिा ‘एक हात खोदिली जमीन। ते पूजनाहूनी पूजन। परिणाम शेकडो व्याख्यानाहून। अधिक त्याचा।।' असा हा ग्रामगीतेच्या उपदेशाचा प्रसाद घेऊन नवतरुणांनी, नव्या पिढीतील समाजसेवकांनी त्याचा प्रचार, प्रसार करावा. ग्रामरचनेच्या कामाला त्यातून योग्य वळण लागेल. अध्यात्मसाधना आणि जीवन व्यवहार याची सुंदर सांगड, सुयोग्य समन्वय या तुकडोजींच्या ग्रामगीतेत आहे. 'ग्रामगीता' हे नावच मुळी सार्थ आहे. देवघरात शांतपणे तेवणाऱ्या नंदादीपासारखीच ही ग्रामगीता आहे.' (१०)